नगर – नगर जामखेड रस्त्यावर अज्ञात चोरटयाकडून घरफोडीची घटना घडली असून या घरफोडीत 19 हजाराच्या रोख रक्कमेसह घरातील इतर वस्तुही चोरल्या गेल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची अधिक माहिती अशी कि फिर्यादी देवब्रत दुखबंधु प्रधान (रा.रेजिमेन्ट ,एसीसी ऍण्ड स्कुल फॅमीली कॉर्टर ,जामखेड रोड,अ.नगर ) हे आर्मी मध्ये नोकरी करीत असून दि. 29 मे रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने त्यांच्या घराच्या खिडकिची जाळी तोडुन घरात प्रवेश करत घरातील साहीत्याची उचकापाचक करून घरातील 19 हजार 790 रूपयांची रोख रक्कम ,तसेच निळया रंगाची शाळेची बॅग , चोरून नेली. तसेच होंडा कंपनीच्या मोटारसायकलची बॅटरी, हेड लाईट चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द भिंगार पोलीस ठाण्यात फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक आर.टी.गोरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)