जामखेड मधील हत्याकांडाच्या निषेधार्थ जामखेड सलग दोन दिवस बंद 

शहरात तणावपूर्ण शांतता : शहराला छावणीचे स्वरूप 
जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी  कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरातील वातावरण तणावग्रस्त असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे जामखेड छावणीचे स्वरूप आले आहे. शहरात जामखेड – बीड रस्त्यावर सोमा काळे याच्या चहाच्या दुकानासमोर बसलेल्या योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात यांच्यासह त्यांचे काही मित्र शनिवार दि. २८ रोजी सायंकाळी चहा घेत असताना एका मोटारसायकल वरून अज्ञात तीन जणांनी येऊन योगेश व राकेश यांच्यावर गावठी कट्टयातून नऊ  फैरी झाडल्या व गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाले होते. सलग दोन दिवस जामखेड शहर बंद ठेवण्यात आले होते.

याला व्यापाऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद दिला.  शहरातील चौका चौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बंदोबस्तासाठी १५ पोलीस पथक तयार करण्यात आले असून यामध्ये ७५ पोलीस कर्मचारी आहेत तसेच शहरात २० पोलीस अधिकारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या ,२०० पोलीस कर्मचारी विविध ठिकाणावरून तैनात करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवकांच्या हत्या प्रकरणात असलेले आरोपी अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी करून जामखेड कडकडीत बंद पाळण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार आज दुसऱ्या दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व दुकाने, व्यापारी बाजारपेठ बंद असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)