जामखेड पालिकेचे मुख्याधिकारी औधकर यांची तडकाफडकी बदली 

जामखेड- मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या व पालकमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या मुख्याधिकारी विनायक औधकर यांना आज अचानक बदली करण्यात आली. कार्यालयीन व शासकीय कर्तव्यात नेहमी विलंब केल्याच्या कारणावरून ही बदली करण्यात आली.

शासन आदेश 1 ऑगस्ट रोजी नगरपालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार कक्षाधिकारी महेंद्र ताकपीरे यांनी शासनाच्या आदेशाचे पत्र जिल्हा प्रशासनाच्या संपर्क कार्यालयाकडे पाठवले असून पुढील नेमणूकीसाठी कारवाईची विनंती केली आहे.या पत्रानुसार औधकर यांना तात्काळ पदमुक्‍त होऊन पुढील नेमणूकीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-

पालिकेच्या स्थापनेपासून मुख्याधिकारी हा विषय कायम चर्चेत राहिला आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा तालुका आहे. शहराच्या विकासासाठी ना. शिंदे यांनी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र. पालिकेला सुरूवातीपासून कायम मुख्याधिकारी नसल्याने विकास कामे रखडली होती.अनेकवेळा नागरिकांनी कायम मुख्याधिकारी देण्याची पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शासनाकडे मागणी केली होती. काही महिन्यापूर्वीच विनायक औधकर यांची कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नियुक्‍ती केली होती. मात्र. नियुक्‍तीनंतरही सहा तब्बल महिने मेडिकल रजेचे कारण दाखवून हजर झाले नव्हते. त्यानंतर हजर झाल्याबरोबर सहा महिनचा पगार प्रथम काढून घेतला. कायमस्वरूपी नियुक्‍ती आसतांना ते आठवड्यातून एक दिवस येऊन दिड दिवसच थांबत होते. त्यामुळे पदाधिकारी व नागरिकांचा मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क होत नव्हता.

तसेच केंद्र व राज्य शासनाच्या समाज उपयोगी विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नागरिकांची किंवा पदाधिकाऱ्यांची बैठक लावली नाही. त्यामुळे अनेक योजना कागदावरच राहिल्या. शहरात विकासाची सुरू असलेल्या कामांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येऊनही मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष दिले नाही. यातून संबंधित ठेकेदार व मुख्याधिकारी यांचे साटेलोटे असल्याची चर्चा शहरात होती. शहरातील अतिक्रमण काढतांना आपल्या वरची जबाबदारी झटकून रजेवर निघून गेले.पालकमंत्र्यांनी सांगूनही औधकरांच्या वागण्यात बदल झाला नाही.पालकमंत्र्यांच्या अनेक महत्वाच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्या औधकरांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामध्ये अनेक चूका आढळून आल्याने ना. शिंदे यांनी औधकर यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)