जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक

अहमदनगर : जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार उल्हास माने याला अटक केल्याचे वृत्त आहे. उल्हास माने हा भाजप नेते आणि पालकमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता आहे. तो आधी मनसे, त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये आहे.

वर्षभरापूर्वी माने याच्या तालमीतील मुलांशी फलक लावण्याच्या कारणावरून योगेश व राकेशचा वाद झाला होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले आहे. या प्रकरणात सुरूवातीला हल्लेखोर गोविंद गायकवाड याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जामखेडमधील बीड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेल्या शनिवारी संध्याकाळी हे हत्याकांड घडले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात हे दोघे त्या हॉटेलमध्ये असताना या दोघांवर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात योगेश आणि राकेश या दोघांचाही मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)