जामखेड तालुक्‍यातील राजेवाडीत घरफोडी; 35 हजारांची रोकड लंपास

नान्नज – जामखेड तालुक्‍यातील राजेवाडी येथे चोरट्यांनी एक घरफोडून 35 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
शुक्रवारी (दि.23) मध्यरात्रीनंतर जामखेड तालुक्‍यातील जामखेड-करमाळा रोडवरील राजेवाडी गावातील कुलदैवत नागनाथ मंदिराच्या पश्‍चिमेस राहत असणाऱ्या अशोक सूर्यभान निबांळकर यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी चोरी केली. साधारण 35 हजार रुपयांची रोकड पळविली. अशोक निबांळकर व शाकुबाई निबांळकर हे दोघे पतीपत्नी झोपेत असतानाच हा प्रकार घडला. अशोक निबांळकर हे पहाटे झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी घरातील पेट्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन दिवसांपूर्वीच्या पत्नीच्या आजारावर उपचारासाठी त्यांनी बॅंकेतून 35 हजार रुपये बॅंकेतून आणून पेटीत ठेवले होते. त्यांनी शेजारीपाजारी घडलेली घटना सांगून पेट्या व इतर साहित्य शोधण्याचा प्रयत्न केला.
घरापासून काही अंतरावर घराच्या पश्‍चिमेस असणाऱ्या श्रीरंग कुमटकर यांच्या शेतात पेट्या पडलेल्या आढळून आल्या. तेथे इतर साहित्यही अस्तव्यस्त अवस्थेत पडलेले होते. घडलेला प्रकार जामखेड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर नान्नज दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी विठ्ठल चव्हाण, गहिनीनाथ यादव, तागड आदी घटनास्थळी दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)