जामखेड आगारात प्रवाशांना उन्हात थांबण्याची वेळ

जामखेड – जामखेड आगाराच्या समोरील अतिक्रमण काढून आगारात ग्रामीण भागातील बसचा थांबा करण्यात आला. येथे बसण्यासाठी शेड नसल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे. थांब्यावर एस. टी. प्रशासनाने प्रवाशांसाठी कुठलीही सोय केलेली नाही.
ग्रामीण भागातील बस एसटी आगारात थांबविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यानुसार आगारप्रमुख शिवाजी देवकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला होता.

नगर-बीड महामार्गावरील एसटी बस आगार परिसरात बांधकामे, स्टॉल्स, दुकाने अशा स्वरूपाचे अतिक्रमण करण्यात आले होते. त्यातच ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बस खर्डा चौकात थांबत असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. जामखेड बसस्थानक शहरापासून 1 कि.मी. अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत होते. आगारात बसथांबा करण्यासाठी आगारासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या. यावर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात एकमत होत नव्हते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेत एसटी बस आगार परिसरातील अतिक्रमण काढले. त्यानंतर जामखेड आगाराने खर्डा चौकातील थांबा बंद करून आगारात थांबा सुरू केला. परंतु, थांबा करताना प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आली नाही.
बस शेड नसल्याने नागरिक उन्हात उभे राहतात. ग्रामीण बस थांब्यावर दररोज 100 ते 150 प्रवासी असतात. त्यांच्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होतो. साकत, खर्डा, सोनेगाव, धनेगाव, जातेगाव, चौंडी, नान्नज, जवळा, चापडगाव बस या आगारात थांबत आहेत. परंतु, प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)