जामखेडात नगर- बीड रस्त्याची दुरवस्था

जामखेड – शहरातून जाणाऱ्या नगर – बीड महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळेवाहन चालकांना कसरत करत चालण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचेयाकडेदुर्लक्ष झालेआहे.

शहरातून जाणाऱ्या नगर ते अहमदपूर, जामखेड ते श्रीगोंदा या दोन राज्य मार्गांचे रुपांतर काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय महामार्गात करण्यात आले. हे दोन्ही महामार्गजामखेड शहरातून जाणार आहेत. या रस्त्यांचे रूंदीकरण होणार आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याबाजूची जमीन संपादित करण्यासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या मध्येजामखेड शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचाही समावेश आहे.

शहरातून जाणाऱ्या बसस्थानकापासून ते बीड रोड, साकत फाटा मार्गे सौताडा घाटापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांचेछोटे- मोठेअपघात होत आहेत.
शहरातील बीड रोड येथील मार्केट यार्डसमोरील रस्त्यावर बराच मोठा खड्डा पडला आहे. स्थानिक दुकान मालकांनी अपघात होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात माती व खडी या रस्त्यावर टाकली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झालेआहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. जामखेड शहरातून जाणाऱ्या करमाळा रोडवरील खर्डा चौक, लक्ष्मी चौक, आरोळेवस्ती पासून तेआयटीआय पर्यंत तीन किमी अंतरावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून अवघ्या 500 मीटरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेआहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)