जामखेडमध्ये आगीत दीड एकर ऊस जळून खाक

दुष्काळात तेरावा महिना,
जामखेड – तालुक्‍यातील साकत जवळील कडभनवाडी येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजता आग लागून लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला, सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. ऐन दुष्काळातच तेरावा महिना अशी म्हणण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वच ठिकाणी टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची हातची पीके वाया गेली असून शिल्लक राहिलेली पीके कशा पद्धतीने जगवावीत असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असतानाच तालुक्‍यातील साकतजवळील कडभनवाडीमध्ये शेतकऱ्यांच्या उसाला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. यावेळी आग लागल्यानंतर कडभनवाडी शिवारातील शेतकरी घटनास्थळाकडे धाव घेत होते. शेतकऱ्यांनी लिंबाच्या पाल्याने, पोतड्यांच्या सहायाने आग काही प्रमाणात विझविण्यास यश आले. शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने आग 4 च्या दरम्यान आटोक्‍यात आली, मोठा अनार्थ टळला.त्या आगीमध्ये गट नं.183 मधील रामचंद्र मारुती कडभने यांचा दीड एकर ऊस जळून खाक झाला. आग विजवण्यासाठी सुशाला नेमाने, अनिता कदम, पूजा कडभने, कल्पना कडभने, कोंडीराम कदम, दादासाहेब मिसाळ, शहाजी कडभने, ज्ञानेश्वर कडभने, सुरेश नेमाने, निलेश नेमाने, नागनाथ वराट, ईश्वर नेमाने यांनी विशेष परिश्रम घेतले. गावचे तलाठी महेश धुमाळ, व बबन गायकवाड, विठ्ठल पुलवळे यांनी पंचनामा केला. साकतचे पोलीस पाटील महादेव वराट, महासांगवीचे पोलीस पाटील राजेंद्र कडभने यांनी पाहणी करून शेतकऱ्यास तत्काळ मदत मिळावी अशी मागणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)