जामखेडमधील अतिक्रमणांवर पडणार पुन्हा हातोडा

उर्वरित अतिक्रमणे निघणार सात दिवसात :
जामखेड – शहरातील अतिक्रमणांबाबत गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर तहसील कार्यालयात पुन्हा अधिकारी व जिव्हाळा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यां समवेत झालेल्या बैठकीत येत्या सात दिवससात उर्वरित अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी यांनी दिली.
गेल्या आठ दिवसापुर्वी प्रशासन व नागरीकांच्या बैठकीत शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणाने नगररोड व बीड रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासंबंधित निर्णय झाला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम व नगरपरिषदेच्या अधिका-यांमध्ये समन्वय नसल्याच्या कारणाने एकाच दिवसात अतिक्रमण मोहीम बारगळली आहे. यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
तसेच उर्वरित अतिक्रमणे हटविण्यात यावीत. यासाठी जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने देखील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले होते. या अनुषंगाने शहरातील उर्वरित अतिक्रमणे काढण्याबाबत मंगळवार (दि.26) दुपारी 3 वाजता तहसीलदार विशाल नाईकवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी, जिव्हाळा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रा मधुकर राळेभात, सिध्दार्थ घायतडक, अवधूत पवार, रामभाऊ सांगळे, विठ्ठल राऊत, शहाजी डोके यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अतिक्रमण मोहीम रेंगाळली याबाबत चर्चा झाली. तसेच जशा गरीबांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सरसकट अतिक्रमणे काढण्यात यावीत. तसेच नगररोड येथील रस्त्याच्या मध्यभागापासून पन्नास फुट अंतरापर्यंत तर बीड रोडवरील रस्त्याचे आंतर हे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवुन दिलेल्या अंतापर्यंत आखुन दिलेल्या रेषेपर्यंत ही अतिक्रमणे काढण्यात येतील असा निर्णय झाला.
तसेच रस्त्याला अडथळा ठरणारे महावितरण विभागाचे विद्युत पोल देखील हटविण्यात येतील. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी यांनी सांगितले की, अतिक्रमण मोहीम रेंगाळली नसुन आम्हाला नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या कामामुळे ही मोहीम थांबली होती. येत्या सात दिवसात नगररोड व बीड रोडवरील अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन सात दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. जर त्यांनी आपले अतिक्रमण काढले नाही तर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमणे हटविण्यात येतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)