जामखेडचा फुलमळा रस्ता जातो चिखलातून 

स्वातंत्र्योत्तर सहा सात दशके चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा 
जामखेड- प्रभाग क्रमांक वीसमधील फुलमाळा वस्ती ते जामखेड हा रस्त्याच नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत वस्तीवरील नागरिक, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट काढावी लागते आहे. नगरपालिकेने या रस्त्याच्या कामासाठी वीस लाख रुपये मंजूर झाले आहेत; मात्र रस्ता करण्याकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही वस्ती चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे.

शहरापासून एक किलोमीटरवर असलेल्या 200 लोकवस्तीच्या फुलमळा येथील वस्तीवरील नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. वस्तीवरील रस्ता पाऊस पडल्यानंतर अत्यंत खराब झाला आहे. परिसरातील नागरिक, शाळकरी मुले-मुली जामखेडला येणे अवघड होऊन बसले आहे. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना आश्‍वासन देणाऱ्या पुढाऱ्यांनाही लक्ष देण्यास वेळ नाही. नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 20 मधील फुलमळा येथील जिल्हा परिषद प्रथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठीच्या रस्त्याचा वनवास संपत नाही. शहरापासून ते फुलमळा वस्ती हे अंतर एक किलोमीटर आहे. येथील रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, विद्यार्थ्यांना अक्षरशः एक फूट चिखलाच्या रस्त्यातून वाट काढत शाळेत जावे लागते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फुलमळा वस्तीवरील रस्ता पाऊस पडल्यानंतर चिखलमय होतो. त्यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी मुले, मुलींना जामखेड शहरातील शाळेत येण्यासाठी अवघड होते. येथील विद्यार्थ्यांना सध्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाला असून विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना अनेक वेळा निवेदने देऊनही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. लोकप्रतिनिधींना अनेकदा साकडे घालण्यात आले. या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी अनेकदा करण्यात आली; मात्र नगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीच केले नाही. लोकप्रतिनिधीही काही करीत नाहीत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पावसाळ्यात शिवार जलयुक्त दिसण्याऐवजी रस्तेच चिखलयुक्त दिसत आहेत. फुलमळा वस्ती येथील रस्त्याचे काम तातडीने न केल्यास विद्यार्थ्यांसमवेत नगरपालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)