जाब विचारला म्हणून वार

पिंपरी – निगडी येथे मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने चार जणांच्या टोळक्‍याने मुलीच्या वडिलांवरच वार केल्याची घटना रविवारी (दि.5) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुधाकर देवराव बावरे (वय 41, रा.निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. अनिकेत संपत गायकवाड, संपत गायकवाड, मोहम्मद करबु, फिरोज करबु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील अणाभाऊ साठे वसाहत परिसरात हा प्रकार घडला.फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रविवारी रात्री एका कार्यक्रमावरून येत असताना आरोपींनी बावरे यांच्या मुलीची छेड काढली. त्यांनी आरोपींना जाब विचारला. याच्या रागातून चौघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच धारधार शस्त्राने त्यांच्या हाताच्या कोपऱ्यावर वार केले. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)