जान्हवी पोहोचली भन्साळींच्या ऑफिसमध्ये

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या धडक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिचे इशान खट्टरसोबतचे शूटिंगचे फोटो व्हायरल झाले होते. याच दरम्यान जान्हवीने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली आहे.

जान्हवी आणि खुशी कपूरने भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. ही मिटिंग कदाचित जान्हवीच्या पुढच्या प्रोजेक्‍ट संदर्भात असू शकते, अशी चर्चा सुरू आहे. जान्हवी सध्या धडकच्या कामात व्यस्त आहे. याशिवाय तिच्याकडे सध्या कोणताच प्रोजेक्‍ट नाही. यामुळे तिची ही भेट तिच्या आगामी चित्रपटाचा इशारा देते आहे. मात्र अजूनपर्यंत तरी जान्हवीने कोणताच नवा प्रोजेक्‍ट साईन केलेला नाही. परंतु, ती भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात असण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)