जान्हवी कपूर साकारणार पायलट 

“धडक’मधून पदार्पण केलेल्या जान्हवी कपूरला आता पायलटचा रोल साकारायचा आहे. सध्या ती करण जोहरच्या प्रॉडक्‍शनच्या “तख्त’मध्ये काम करते आहे. करण जोहरने आता बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने या कथेसाठीचे हक्कही विकत घेतले आहेत. देशातील पहिल्या लढाऊ विमानाच्या पहिल्या पायलट गुंजन सक्‍सेनाच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला असेल. गुंजन सक्‍सेना यांनी 17 वर्षांपूर्वी भारत पाकिस्तान दरम्यानच्या कारगिल युद्धामध्ये भाग घेतला होता.

1994 साली 25 महिलांना भारतीय वायुदलामध्ये पायलट बनण्याची संधी मिळाली होती. त्यापैकी एक गुंजनना ट्रेनी पायलट बनण्याची संधी मिळाली होती. त्या रोलसाठी करण जोहरने जान्हवी कपूरची निवड केली आहे. जान्हवीची मानसिक तयारीही करणने करून घेतली आहे. गुंजन सक्‍सेनाचा रोल साकारण्याची क्षमता जान्हवी कपूरमध्ये आहे, असा करण जोहरचा दावा आहे. हा रोल तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत नवोदित अभिनेत्रींना इतका महत्वाचा रोल क्वचितच दिला गेला होता. त्यादृष्टीने जान्हवीसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. आता या संधीचे ती कसे सोने करते, हे बघायला पाहिजे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)