जान्हवी कपूर शिकत आहे ‘उर्दू’!

‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी सिनेमांसाठी जोमाने तयारीला लागली आहे. जान्हवीने पहिल्याच सिनेमातून सगळ्यांनाच प्रभावित केले. या चित्रपटाच्या यशानंतर ती दोन बिग बजेट सिनेमांमध्ये भूमिका साकारणार आहे. त्यातील दिग्दर्शक करण जोहरच्या ‘तख्त’ मध्ये जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मुघल साम्राज्यावर आधारित आहे. म्हणून या चित्रपटासाठी जान्हवी उर्दू शिकत आहे.

चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, अनिल कपूर, विक्की कौशल यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा मुघल साम्राज्यावर आधारित असल्याने सिनेमातील कलाकारांना उर्दू भाषा शिकावी लागणार आहे. यांत जान्हवी जैनाब्दी महल उर्फ हिराबाईची भूमिका साकारणार आहे. यासाठी तिलाही उर्दू शिकण्यास सांगण्यात आले आहे. जान्हवी आता उर्दूचे धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे. इतकेच नाही तर तिला काही पुस्तकेसुद्धा वाचण्यासाठी देण्यात आली आहेत. औरंगजेब-द मॅन अँड द मिथ आणि स्टोरीओ दो मोगोर ही बड्या इंग्रजी साहित्यिकांची पुस्तकं ती वाचत आहे. औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारित हा सिनेमा 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या अभिनय कौशल्याला सुधारण्यासाठी कोणत्याही प्रोत्साहनाचे स्वागतच आहे, असे तिने म्हटले आहे. नॉर्वेजियन दूतावासाने दिलेल्या “शूटिंग स्टार ऑफ द इयर’ पुरस्कार पप्पा बोनी कपूर यांच्यासह स्वीकारताना तिने ही भावना व्यक्‍त केली. याच दरम्यान तिने आणखी एका गोष्टीचा गौप्यस्फोट केला. “धडक’च्या शुटिंगच्या आगोदरच तिने इन्स्टाग्रामवरील आपले सगळे फोटो डिलीट करून टाकले होते. प्रोत्साहन मिळावे ते आपल्या अभिनयाला मिळावे, असे तिला वाटत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)