“धडक’ चित्रपटातून अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये यशस्वीपणे डेब्यू केले. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीपासूनच ती सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी जान्हवी आपल्या आगामी चित्रपट, पार्टी किंवा हॉलिडेमुळे चर्चेत नसून ती तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. जान्हवीला पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे अनेकांनी ट्रोल केले.

जान्हवीचा शॉर्ट ड्रेसमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या तिने केवळ पिंक कलरचा टी-शर्ट घातल्या असून त्यात तिने शॉर्टस घातल्याचे दिसत नाही. हा फोटो प्रसिद्ध होताच अनेकांनी ड्रेसवरून तिला ट्रोल केले. काही जणांनी “खूप मोठा ड्रेस… बहूतेक पॅट घालायची विसरली’ यासारख्या कॉमेंट केल्या, तर काही जणांनी “हॉट’, “नाइस’ आदी कॉमेंट केल्या आहेत.

ही पहिलीच वेळ नाही की, जान्हवीला तिच्या कपडयांवरून ट्रोल करण्यात आले. यापूर्वीही जान्हवीला शॉर्ट ड्रेस घातल्याने ट्रोल करण्यात आले होते. मात्र, या प्रकारानंतर ट्रोल्सबाबत अर्जुन कपूरने नाराजी व्यक्‍त केली. दरम्यान, जान्हवी कपूर ही करण जोहरच्या “तख्त’ या चित्रपटासह अन्य एका चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)