जान्हवी कपूरचे स्विझलॅडमध्ये फोटो शूट 

फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी हिने एक नवा फोटो शूट केला. ती यात नववधू बनली आहे. ती यातील फोटोत अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोसोबत मनिष मल्होत्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती मनिष आणि फोटोशूटबद्दल बोलताना दिसत आहे.

सोशल मीडीयावर नववधुच्या ड्रेसमध्ये असलेली जान्हवी खूपच सुदंर दिसत असून ब्राइडल लुकमध्ये ती एकदमच वेगळी दिसत आहे. सध्या जान्हवी कपूर ही मनिष मल्होत्रासोबत स्विझलॅडमध्ये आहे. जेथे त्यांनी हे फोटोशूट केले. यात तिने मनिष मल्होत्रासोबत सुंदर अशा पोज दिल्या आहेत.

-Ads-

दरम्यान, अलिकडेच जान्हवी कपूरचा “धडक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दमदार अभिनय साकारत यशस्वीपणे पर्दापण केले. “सैराट’ या मराठी चित्रपटाचाहा हिंदी रिमेक होता. ती धर्मा प्रॉडक्‍शनच्या आगामी “तख्त’ या चित्रपटात काम करणार आहे. “तख्त’चा विषय एक परिवार, महत्वाकांक्षा, लालच, विश्वासघात आणि प्रेम याभोवती गुंफण्यात आला आहे. “तख्त’ हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात करिना कपूर खान, आलिया भट्ट, अनिल कपूर, भूमी पेडनेकर, विकी कौशल आणि जान्हवी कपूर यांच्या मूख्य भूमिका असतील.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)