जान्हवीला दक्षिणेतल्या सिनेमात जायचय

हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री हिंदीच्या आगोदर अनेक दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करत होत्या. श्रीदेवीनेही हिंदी सिनेमा करण्यापूर्वी अनेक तमिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले होते. हिंदीमध्ये यशस्वी होण्यापूर्वी श्रीदेवीने तिने दक्षिणेत सुपरस्टार अशी ओळख मिळवली होती. श्रीदेवीची कन्या जान्हवीचा “धडक’ यावर्षी रिलीज झाला. त्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले. मात्र आता आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून जान्हवीलाही दक्षिणेतल्या सिनेमांची ओढ लागून राहिली आहे. त्यासाठी तिने आपली इच्छा बोलूनही दाखवली आहे. दक्षिणेतल्या मल्याळम सिनेमात काम करायची संधी मिळायला हवी, असे तिने म्हटले आहे. त्यासाठी केवळ स्क्रीप्ट चांगली असायला हवी, ही एकच अट तिने निश्‍चित केली आहे.

जान्हवीला जुने सिनेमे खूप आवडतात. गुरुदत्त हे तिचे सर्वात आवडते अॅक्‍टर-डायरेक्‍टर आहेत. सिनेमाला एकाच भाषेच्या चौकटीत बांधायला तिची तयारी नाही. त्यामुळे सर्व प्रादेशिक भाषांचे पर्याय आपल्यासमोर खुले असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिच्या बॉलिवूड करिअरला आताच सुरुवात होते आहे. आताच जर केवळ एका भाषेपुरते स्वतःला मर्यादित ठेवले तर भविष्यातील प्रगती कशी होणार, असा विचार तिने केला आहे. सुदैवाने स्टार किड असल्याने तिच्यासमोर निर्माते दिग्दर्शकांच्या निवडीचा प्रश्‍न फारच क्‍वचित येऊ शकतो. तिचे पप्पा बोनी कपूर यांनीही आपल्या लाडक्‍या कन्येसाठी भविष्यात चांगला सिनेमा प्रोड्युस करायचे ठरवले आहे. मात्र असे असले तरी आपली तुलना आई, श्रीदेवीबरोबर केली जाऊ नये, असे जान्हवीला वाटते. कोणत्याच स्टारकिडला अशी तुलना आवडणार नाही.

दरम्यान जान्हवीबाबत आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली आहे. “धडक’मधील हिरो असलेल्या इशान खट्टरबरोबर जान्हवीचे डेटिंग सुरू असल्याचे समजते आहे. “धडक’ रिलीज झाल्यापासून ही चर्चा व्हायला लागली होती. इशान हा शाहिद कपूरचा भाऊ असल्याने त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शाहिदवर स्वाभाविकपणेच आली होती. शाहिदने आपल्या भावाला याबाबत समजावण्याचाही प्रयत्न केला. आता आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायला हवे, अशा शब्दात शाहिदने इशानला समजावले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)