श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर सोशल मिडीयावर ऍक्‍टिव्ह झाल्यापासून तिला त्रासच व्हायला लागला आहे. एक रोमिओ तिला सारखे “आय लव्ह यू’चे मेसेज पाठवून त्रास द्यायला लागला आहे.

कार्तिक विजय नावाचा हा रोमिओ चेन्नईतला रहाणारा आहे. त्याने जान्हवीबरोबर आपलाही फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. त्याने सारखे “आय लव्ह यू’चे मेसेज पाठवूनही अद्याप जान्हवीच्या घरच्यांकडून कोणतीही रिऍक्‍शन दिलेली नाही. करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्‍शनच्या निर्मितीखालील “धडक’मधून जान्हवीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे. 20 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

या सिनेमातला तिचा लुक बघूनच तिचे फॅन तिच्यावर फिदा झाले आहेत. त्यापैकीच हा एक सरफिरा आहे. त्याच्या मेसेजवरून हा एक रोड साईड रोमिओ असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. कारण त्याने स्वतःचे फोटो आणि स्वतःच्या नावाव्यतिरिक्‍त आणखी कोणतीही माहिती उघड होऊ दिलेली नाही. त्याच्या मेसेजमध्ये केवळ “आय लव्ह यू’ आणि “आय मिस यू जानू’ या व्यतिरिक्‍त आणखी काहीही लिहीलेले नसते. त्याचा बंदोबस्त करणे जान्हवीसाठी अवघड नाही. मात्र त्याला उगाच महत्व देऊन विनाकारण आपली एनर्जी वाया घालवायला नको, असा विचार तिने केला असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)