जान्हवीच्या भोवती लहानग्यांचा गराडा

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरच्या आगामी “धडक’ची क्रेझ इतकी वाढायला लागली आहे, की जान्हवीच्या फॅन्सनी तिला आताच डोक्‍यावर घेतले आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि ईशान बांद्रयातल्या एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच त्यांना फॅन्सनी गराडा घातला. त्यातील लहान मुलांनी तर जान्हवीला वेढा घालून अक्षरशः डान्स करायला लावले. आजूबाजूचे अनेक जण मोबाईलमध्ये जान्हवीचे फोटो काढायला लागले.

मुलांच्या गराड्यातून जान्हवीला तिच्या बॉडीगार्डनी बाहेर काढले. या गोंधळामुळे जान्हवी थोडी बावरलेली, तर थोडी खुशीत दिसत होती. तिला या फॅन्सचे प्रेम तर हवे हवेसे वाटत होते. मात्र त्यांच्या प्रेमामुळे एकप्रकारचा असुरक्षितताही जाणवायला लागलेला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अचानक रस्त्यावर एखादी स्टार दिसल्यावर चाहत्यांकडून काय काय प्रतिक्रिया येऊ शकतात, याचा अनुभव तिला मिळाला.

“धडक’ हा धर्मा प्रॉडक्‍शनच्या बॅनर खाली तयार होणारा सिनेमा येत्या जुलैमध्ये रिलीज होणार आहे. आपल्या या डेब्यु फिल्मसाठी जान्हवी अगदी उत्सुक आहे. काही दिवसांनी याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिला आपल्या फॅन्सबरोबर एकत्र यायचे आहे. त्याची मानसिक तयारीच परवाच्या अनुभवातून तिला करायला मिळाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)