जानेवारीत कामगार दोन दिवस संपावर

पिंपरी – कंत्राटीकरण, जनविरोधी खासगीकरण रद्द करण्यासाठी, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षेच्या हक्कासाठी देशभरातील कामगारांचा सर्व संघटनांच्या वतीने 8 व 9 जानेवारी 2019 ला अखिल भारतीय संप पुकारण्यात आला आहे. त्याची घोषणा डॉ. जी. संजिवा रेड्डी यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, ज्येष्ठ कामगार नेते ऍड. म. वि. अकोलकर, अजित अभ्यंकर, दिलीप पवार, मनोहर गाडेकर, अनिल आवटी, शशिकांत धुमाळ, वसंत पवार, अनिल रोहम, यशवंत सुपेकर, भारती घाग आदी उपस्थित होते.

रेड्डी यांनी सांगितले की, केंद्र सरकार सार्वजनिक बॅंका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना, केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना, सरकारी व निम सरकारी महामंडळे यांसह संरक्षण क्षेत्रात देखील खाजगीकरण व कंत्राटीकरण करीत आहे. हे खासगीकरण जनविरोधी व सर्व समाजाची सामाजिक सुरक्षा धोक्‍यात आणणारे आहे. यामुळे देशभरातील कोट्यावधी कामगार व त्यांची कुंटूंबियांचे आर्थिक, सामाजिक शोषण सरकार बरोबरच भांडवलदार वर्ग करीत आहे. अनेक राज्यात किमान वेतनामध्ये दहा ते पंधरा वर्ष वाढ केली जात नाही. त्यामुळे कामगारांचा आर्थिक स्थर व सामाजिक सुरक्षा धोक्‍यात येते. राज्य सरकारचे अनेक महामंडळे किमान वेतन कायद्याची पायमल्ली करताना दिसते.

मोदी सरकारने कामगार क्षेत्रामध्ये नीम नावाची नवीन वर्गवारी तयार केली आहे. यातून कंत्राटी पध्दतीने भरण्यात आलेले शिकाऊ कामगार वर्षांनुवर्षे शिकाऊ कामगारच राहणार आहेत. त्यामुळे भांडवलदारांना कमी वेतनात कुशल मनुष्यबळ मिळते. परंतु, कामगारांना मात्र कोणतीही सेवा, सुविधा, हक्क, सुरक्षा नियमानुसार मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या श्रमावर देशाचा विकास होत असताना त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी देशभरातील सर्व कामगार संघटनांनी दोन दिवसीय अखिल भारतीय संपाची घोषणा केली आहे. या संपात इंटक, आयटक, सिटू, एचएमएस, टीयुसीसी, एआययुटीयूसी, एआयसीसीटीयू, सेवा, युटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, बॅंक, विमा, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, वीज मंडळ, राज्य सरकारी कर्मचारी आदी संघटना सहभागी होणार असल्याचे डॉ. संजीवा रेड्डा यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)