जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था आयोजित वक्‍तृत्त्व स्पर्धेत पिंपरी-चिंचवड परिसरातील 24 शाळांनी तिसरी व चौथी तर 27 शाळांनी पाचवी व सातवी गटात सहभाग घेतला. बजाज प्रकल्प प्रमुख व विश्‍वस्त संजय भार्गव, प्रकल्प सल्लागार डॉ. चित्रा सोहनी, सहा. व्यवस्थापक के.बी.वाळके, सचिव पार्थसारथी मुखर्जी, तरसे परीक्षक म्हणून ललिता आगाशे, दत्तात्रय तापकीर, अनघा दिवाकर, मनीषा बोरा यांनी काम पाहिले. वक्‍तृत्त्व स्पर्धेत भारतीय जैन संघटनख प्राथमिक विद्यालयाचा भाग्येश चंद्रकांत भालेराव, ज्ञानदीप विद्यामंदिर रुपीनगरच्या अनंत शिवशरण साकोरजी, एचए स्कूलच्या मानस झेंडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुनावळे येथील शाळेच्या संजना पोटे या विद्यार्थ्यांनी तिसरी व चौथीच्या गटात पारितोषिक पटकावले. पाचवी ते सातवीच्या गटात क्रांतीवीर चापेकर विद्यामंदिरची गिरीजा भूषण, चिखली येथील मनपा कन्या शाळेची श्रेया पवार, निगडी येथील मनपा कन्या शाळेची मदुरा दांडेकर, मनपा रमाबाई आंबेडकर कन्या शाळा, अजिंठानगरची नम्रता इंगळे या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते, तसेच शाळांना विविध प्रकारे मदत केली जाते. संस्थेच्या या कार्यानिमित्त भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था व शालेय समितीचे अध्यक्ष अरुण नहार यांनी संस्थेचे अभिनंदन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)