जानकर, शिंदे या धनगर समाजाच्या मंत्र्यांच्या गाड्या फोडाव्या लागणार- खेमनगर

धनगर समाजाचा तहसील कार्यालयावर डफांच्या निनादात मोर्चा
राहाता – भाजप सरकारने धनगर समाजास आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली असून यापुढे उग्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागणार आहे. आमदार, खासदार व मंत्र्यांच्या गाड्या फोडाव्या लागतील. पहिल्या गाड्या धनगर समाजाचे मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, व खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या फोडाव्या लागणार आहेत तरच घटनेने दिलेले न्याय हक्काचे आरक्षण मिळेल, असे प्रतिपादन दत्तात्रय खेमनर यांनी केले.
धनगर समाजाच्यावतीने येथील ग्रामदैवत वीरभद्र देवस्थान येथून तहसील कार्यालयावर पारंपारीक डफांच्या निनादात मोर्चा नेवून शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत रोष व्यक्‍त करण्यात आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले त्यावेळी खेमनर बोलत होते. ना. महादेव जानकर, ना. राम शिंदे व डॉ.विकास,महात्मे हे राज्य सरकारचे हस्तक आहेत. हे जोपर्यंत सरकारमध्ये आहेत, तोपर्यंत धनगर समाजास आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाच्या आमदार, खासदारांचा आदर्श घेवून जाणकर, शिंदे व महात्मे यांनी समाजाच्या प्रश्‍नावर राजीनामा द्यायला हवा. भाजप सरकार कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारपेक्षा निर्लज्य निघाले. यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. न्याय हक्कासाठी लढा अधिक तीव्र स्वरुपाचा करावा लागेल असे खेमनर म्हणाले.
घटनेने दिलेल्या न्याय हक्काची अंमबजावणी राज्य व केंद्र सरकारने पार पाडण्याची गरज असतांना सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर पंधरा दिवसात आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. खोट्या घोषणा करुन त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केल्याचे दिलीपराजे सातव म्हणाले. धनगर समाजास एसटी आरक्षण मिळावे,अशी राज्य व केंद्र सरकारची इच्छा नाही. धनगर समाजास राज्यात एनटी, केंद्रात ओबीसी तर राज्यघटनेत एसटी अशी तीन वेगवेगळी आरक्षणे आहेत. एकाच समाजास तीन वेगवेगळी आरक्षण कशी काय? राज्य आणि केंद्र सरकारची ही फसवाफसवी असल्याचे ज्येष्ट नेते भास्करराव फणसे म्हणाले.
यावेळी विश्‍वनाथ वाघ, नानासाहेब काटकर, ऍड. गोकुळ धावणे, ज्ञानेश्वर सोडणार, डॉ.संपत निर्मळ, राधुजी राऊत, अंकुश भडांगे, राजेंद्र पठारे व बाळासाहेब गिधाड यांची भाषणे झाली. प्रा. शिवाजी कांदळकर यांनी निवदेनाचे वाचन केले. तहसीलदार माणिकराव आहेर यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)