जाधव यांना सेनेकडून सॉफ्ट कॉर्नर

नगर: महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव यांना शिवसेनेकडून बाय देण्यात आला आहे. जाधव यांनी शिवसेनेऐवजी बसपचे तिकिट घेतले आहे. या प्रभागाची राजकीय स्थिती लक्षात घेवून जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेने जाधव यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही.

जाधव यांची सरळ लढत आता राष्ट्रवादीबरोबर होणार आहे. जाधव यांनी स्थानिक उमेदवारांचे मंडळ केले आहे. त्यात शिवसेनेचे माजी कार्यकर्ते जसपाल पंजाबी याच्याबरोबर युती केली आहे. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेची मदत जाधव यांना होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)