जाधव यांना वकिलातीची मदत देण्यावरून पाकिस्तानचा रडीचा डाव

म्हणे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तसा आदेश दिलाच नाही
इस्लामाबाद – भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना वकिलातीची मदत नाकारणाऱ्या पाकिस्तानचा रडीचा डाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तसा आदेशच दिला नसल्याचे आता त्या देशाने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याला स्थगिती दिल्याने पाकिस्तानला जोर का झटका बसला. मात्र, जणू काही घडलेच नसल्याचा आव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझिझ यांच्या येथील पत्रकार परिषदेत त्याचेच प्रत्यंतर आले. फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून नेहमीच स्थगिती आदेश दिला जातो, असे ते म्हणाले. भारताकडून अनेकवेळा जाधव यांना वकिलातीची मदत उपलब्ध करण्यासंबंधीची विनंती करण्यात आली. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तानने ती फेटाळली. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशामुळे वकिलातीच्या मदतीसंबंधी पाकिस्तानला शहाणपण सुचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तसा आदेशच दिला नसल्याचे म्हणत अझिझ यांनी पाकिस्तानच्या आडमुठेपणाचे दर्शन घडवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)