जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक

सुरुवातीच्या टप्यातच जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार?
पुणे – यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता शासनाचे अचानकपणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीच्या टप्प्यातच जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षीपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेशाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे संबंधित महाविद्यालयात सादर केले जात होते. त्या टप्प्यातही जर एखाद्याकडे प्रमाणपत्र नसेल तर त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेत त्याला मुदत दिली जात.

-Ads-

अनेक महाविद्यालयांनी आता अशा प्रकारे मागणी करण्यास सुरुवात केली असल्याने व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय शाखा, हॉटेल मॅनेजमेंट अशा सर्व शाखांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच राज्य शासनाने याबाबत त्त्वरीत लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावी अशी मागणी संघटनेचे शहर अध्यक्ष सुमित भोळे यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत विचारणा करण्याकरिता पुणे विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)