“जात्यावरची ओवी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, येथील सम्राज्ञी ग्रुपच्या वतीने नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहात “जात्यावरची ओवी व आयुर्वेद पावलोपावली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

त्यात ओव्या आणि आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा भाग असून, आजही त्याचा आपल्या आरोग्याशी असलेला संबंध कलाकारांनी प्रस्तूत केला. मंगळागौरीचा खेळ, जोगवा नृत्य, बाळंत विड्याचे महत्त्व सांगणारी वैदीन यातून पूर्वीच्या स्त्रिया मनोरंजनातून आरोग्य जपत असल्याचे दाखविण्यात आले.

त्यासाठी नृत्य व लोकगीतांचा आधार दाखविण्यात आला, त्यानंतर कानाखाली गणपती काढेन या विनोदी एकांकीकेच्या माध्यमातून अंधश्रद्धेबाबत जागृती करण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमांचे दिग्दर्शन वसुधा गोडसे यांनी, तर संगीत संयोजन इशांत गोडसे या बालकलाकाराने केले. या कार्यक्रमात शर्मिला चिटणीस, मंजूषा होनराव, शुभम करार, सुजाता चवज, कल्याणी भंवर, स्वानंद गायकवाड, अन्वेषा चवज आदी कलाकारांचा सहभाग होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)