जातेगाव संभाजीराजे विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश

शिक्रापूर- जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले असून तीन विद्यार्थिनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत, अशी माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली आहे.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील विद्यार्थ्यांनी इनामगाव येथे जिल्हा क्रीडा परिषद आणि क्रीडा अधिकारी पुणे यांच्या वतीने आयोजित शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये पाच विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. तर तीन विद्यार्थिनींची जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये कुस्ती स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : सतरा वयोगटामध्ये श्रद्धा संभाजी उमाप आणि मयुरी राजेंद्र इंगवले प्रथम क्रमांक, एकोणीस वयोगटामध्ये श्वेता राजेंद्र डफळ प्रथम क्रमांक, इशा सचिन शेरेकर द्वितीय क्रमांक, अक्षय तानाजी धुमाळ द्वितीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश संपादित केले असून यापैकी श्वेता डफळ, श्रद्धा उमाप आणि मयुरी इंगवले यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक कांतीलाल धुमाल्व प्रमोद काळे यांनी मार्गदर्शन केले आहे. तर सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य रामदास थिटे, संस्थेचे अध्यक्ष सुगंधराव उमाप, सचिव प्रकाश पवार यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)