जातेगाव बुद्रुकमध्ये शिवसेनेला धक्का

शिक्रापूर- जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील शिवसेना शाखा प्रमुखांसह इतर शिवसैनिकांनी शिवसेनेला रामराम करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसशी घरोबा केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. जातेगाव बुद्रुक येथील युवक कार्यकर्ते व शिवसेना शाखा प्रमुख हमीदभाई पठाण, दादासाहेब पवार, यश पवार यांसह आदी युवक कार्यकर्त्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी प्रवेश करणाऱ्या युवकांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पुणे जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार, शंकर जांभळकर, केशर पवार, राष्ट्रवादीचे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमोल जगताप, नागेश खळदकर यांसह आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)