जातेगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी सुनील होळकर बिनविरोध

शिक्रापूर – शिरूर तालुक्‍यातील जातेगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदी पै. सुनील गजानन होळकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) या ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवेंद्र उमाप यांनी त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेची नुकतीच निवडणूक घेण्यात आली. जातेगाव बुद्रुकच्या सरपंच मंगल इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच देवेंद्र उमाप, विशाल उमाप, ग्रामपंचायत सदस्य विक्रम उमाप, सुनील होळकर हे उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत सुनील होळकर यांनी उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल केला होता. यावेळी इतर कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सुनील होळकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी निर्मला खेडकर यांनी जाहीर केले. या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच सुनील होळकर यांचा सात्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मंगल इंगवले, साहेबराव सातपुते, कुस्तीगीर संघाचे तालुका उपाध्यक्ष अनिल होळकर, शरद उमाप, उल्हास क्षीरसागर, उद्योजक प्रकाश चव्हाण, निवृत्ती काळोखे, प्रवीण इंगवले, रंगनाथ इंगवले, अजित पटेकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी बोलताना गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहून गावच्या विकासाला प्राध्यान्य देत नागरिकांच्या अडचणी सोडविणार आहे, असे नवनिर्वाचित उपसरपंच सुनील होळकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)