जाती, धर्मावरची फाळणी जास्त धोकादायक

हजारे यांचे मत; सायकल यात्रेतील युवकांशी साधला संवाद

नगर – सद्‌भावना आणि अहिंसापालनात मानवी विनाश टाळण्याचे सामर्थ्य आहे. त्यासाठी महात्मा गांधी यांना भारतीयांनी प्रामाणिकपणे अनुसरले पाहिजे. भारतीय समाजाची सध्या जाती आणि धर्माच्या आधारावर झालेली फाळणी ही 1947 सालच्या भारताच्या फाळणीपेक्षाही जास्त भयावह आहे. ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला देश पुन्हा एकसंध करण्यासाठी गांधीविचार उगवत्या पिढीत पेरण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त 29 सप्टेबर ते 02 ऑक्‍टोबर दरम्यान स्नेहालयच्या युवनिर्माण प्रकल्पाने “स्नेहालय ते राळेगणसिद्धी’ अशी संवेदना जागृती सायकल यात्रा काढली होती. या सायकल यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आठ ते 62 वयापर्यंतचे तब्बल 100 जण सहभागी झाले होते. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील दीडशे गावातून ही यात्रा फिरली. पथनाट्ये आणि प्रेरणागीते सादर करून या यात्रेने गांधी विचारांचे जागरण केले. या यात्रेत स्वित्झर्लंड येथून आलेली गांधीवादी कार्यकर्ती तानिया रिझो, लंडन येथून आलेले निक कॉक्‍स आणि जॉयस कोनोली, काश्‍मीरमधील पाकिस्तान सीमेवरून आलेला बिलाल सय्यद आणि त्याचे चार सहकारी, गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथून आलेले आंतरराष्ट्रीय सायकलयात्री हिरालाल यादव, क्रीडापटू वेदपाल तन्वर, ऍड. श्‍याम आसावा, बाळासाहेब काकडे, लालबत्ती भागातील काही महिला, स्नेहालयमधील एचआयव्ही बाधित, अनामाप्रेम संस्थेतील अपंग, मुले व मुली यांच्यासह नगरच्या झोपडपट्टीतील बालभवन प्रकल्पातील युवक सहभागी झाले होते. 220 किलोमीटरच्या या सायकलयात्रेत प्रत्येक गावात स्थानिक युवक आणि विद्यार्थी यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
सुमारे एक लाख लोकांशी यात्रेकरूनी थेट संवाद केला. यात्रेचा समारोप हजारे यांच्या उपस्थितीत राळेगणसिद्धी येथे झाला. गांधीविचारांची निष्ठेने पाठराखण केल्याबद्दल सायकल यात्रेकरूंनी अण्णांना अभिवादन करून यात्रेचा समारोप केला. यात्रेसाठी बंडूशेठ गाडेकर, पुरुषोत्तम लगड, अमोल लगड, असिफ शेख, सुमित बोरा, सतीश गुंदेचा, सतीश पोखरणा, केशव कातोरे, उक्कडगाव येथील मुंजोबा महाविद्यालयाचे प्राचार्य भगवानराव शिर्के, अतुल लोखंडे, दीपक वाघमारे, शहाजी हिरवे, बाबा आमटे संस्थेचे अनंत झेंडे आदींनी सर्व सायकल यात्रींकरीता सहभाग दिला. महात्मा गांधीच्या सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य, विश्वस्त भावना, अराज्यवाद, अंत्योदय, सर्वोदय, सर्वधर्म एकता या मूल्यांचा परिचय या सायकल यात्रेदरम्यान नागरिकांना देण्यात आला. युवनिर्माणचे समन्वयक विशाल आहिरे, महेश मरकड, किरण कळके, अमोल खरात, मीरेन गायकवाड, मोनिका फिसके, पायल शिंदे आदींनी सर्व सायकलयात्रेचे संयोजन केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)