जातीवादी राजकारणाच्या झुल्यावर विकासाला झुलवत ठेवले ; राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. सत्तेत आल्यापासून भाजपच्या सरकारने केवळ नवनवीन घोषणा केल्या आहेत. त्या सगळ्या आजवर पोकळ आणि फसव्याच निघाल्या. एक मुद्दा झाकण्यासाठी दुसरा मुद्दा किंवा वाद निर्माण करण्याची तर या सरकारची नीती असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर भाजपवर टीका केली आहे. जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या सरकारच्या अपयशाकडे जनतेचेही दुर्लक्ष व्हावे यासाठी वेगवेगळे वादग्रस्त मुद्दे उकरुन काढण्याकडेच या सरकारचा अधिक कल दिसतो. या सगळ्या गोंधळात चार वर्षांपूर्वीपासून ज्या विकासाच्या वल्गना हे सरकार करत होते, तो मात्र कुठे औषधालाही सापडत नाही. जातीवादी राजकारणाच्या झुल्यावर विकासाला झुलवत ठेवणाऱ्या या सरकारला जनताच योग्य भाषेत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

-Ads-

सत्तेत आल्यापासून भाजपच्या सरकारने केवळ नवनवीन घोषणा केल्या आहेत. त्या सगळ्या आजवर पोकळ आणि फसव्याच निघाल्या. एक मुद्दा…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Wednesday, 5 December 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)