जातीवाचक शब्द वापरून मारहाण केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा

लोणी काळभोर- घरासमोरून गेला, या कारणांवरून दोघांना जातीवाचक शब्द वापरून दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी 13 जणांवर (ऍट्रॉसिटी) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सुनील भगवान खलसे (वय 32, रा.कुंजीरवाडी, माळवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विकास हौशीराम निगडे, भाऊसाहेब हौशीराम निगडे, भाऊसाहेब यांची पत्नी आणि आई (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्यासमवेत इतर 7 ते 8 (सर्व रा. निगडेवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील खलसे हे भाऊसाहेब निगडे यांच्या चांगल्या परिचयाचे आहेत. ते खलसे आणि त्यांचे नातेवाईक यांचेशी काही ना काही कारण काढून वेळोवेळी भांडत असतात. परंतु गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सांगण्यावरून खलसे यांनी तक्रार केली नव्हती.
गुरूवारी (दि.4 ऑक्‍टोबर) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास खलसे आणि त्याचे दाजी अक्षय शिवा देढे हे दोघे नायगांव येथे दुचाकीवरुन निघाले होते. ते निगडेवस्ती येथून जात असताना भाऊसाहेब निगडे यांच्या घरासमोर आले. त्यावेळी भाऊसाहेब मोबाईलमध्ये त्यांचे शुटिंग करत होते. याप्रकरणी वाहन थांबवून खलसे यांनी विचारणा केली असता निगडे याने “जातीवाचक शब्द वापरून माझे घराकडे काय काम आहे. रस्ता तुझ्या बापाचा आहे का? तुमची लायकी नाही. या रस्त्याने यायची’ असे म्हणाला. याचा खलसे यांना राग आल्याने दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर निगडे याने दुचाकी ओढल्याने खलसे आणि त्यांचे दाजी कोसळले. त्यानंतर निगडे यांनी हात आणि लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आवाज देऊन घरांतील लोकांना बोलावले. त्यावेळी विकास निगडे, भाऊसाहेब निगडे यांची आई, पत्नी आणि त्यांचेसमवेत 7 ते 8 अनोळखी व्यक्‍ती आले. या सर्वानी दोघांना दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.
यावेळी त्यांच्या तावडीतून दोघे कसेबसे सुटले. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना खलसे यांनी नातेवाईकांना फोन केला. तेव्हा त्यांना मारहाण करणारे त्यांचे घराकडे जाऊन त्यांची आल्टो कार (एमएच 12 इएम 8087) पेटवून दिली आहे, असे सांगितले. तसेच ते पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यांची बहिण तेथे आली. तेथे विकास निगडे आणि काकासाहेब गाढवे यांनी तिचा हात धरून विनयभंग केला. तसेच तिच्या लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आहे, असे सुनील खलसे यांना सांगितले. याचा पुढील तपास हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड हे करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)