जातीवाचक बोलणाऱ्याला दहा हजारांचा दंड

भिंगारमधील कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण

भिंगार – घरासमोर साफसफाई करत असलेल्या कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्याला जीतावाचक बोलून त्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी असीफ अबीद हुसेन सय्यद याला दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा दंड फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. आरोपीचा हा पहिलाच गुन्हा असून, न्यायालायने चांगल्या वर्तणुकीच्या एक वर्षाच्या प्रतिज्ञापत्रावर खुले केले आहे.

सफाई कामगार मोहन रतन रोकडे हे आरोपी असीफ अबीद हुसेन सय्यद याच्या घरासमोर 29 जानेवारी 2015 रोजी साफसफाई करत होते. आरोपी असीफ याने मोहन याचा अपमान केला. घरासमोर लावलेले चारचाकी वाहन बाजूला काढण्याच्या कारणावरून जीतवाचक शिवीगाळ केली. असीफ याने यानंतर मोहन याला फाईटने मारहाण केली. यानंतर मोहन याने भिंगार कॅम्प पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तत्काली पोलीस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. अतिरीक्त सरकारी अभियोक्ता ऍड. मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश जगताप यांनी आरोपी असीफ याला दोषी धरले. असीफ याचा पहिलाच गुन्हा असल्याने त्याला चांगल्या वर्तणुकीच्या 1 वर्षाच्या प्रतिज्ञापत्रावर खुल केले. परंतु दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. या दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)