जातीभेद नसल्यास विकास प्रक्रिया अधिक गतिमान’

कोपरगाव – “”जेथे जातीभेद आणि मनभेद नाही तेथे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होते,” असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
तालुक्‍यातील येसगाव ग्रामपंचायतच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण शनिवारी झाले. पंचायत समिती सभापती अनुसया होन, दत्तात्रेय कोल्हे, उपसभापती अनिल कदम, कुशाराम आहेर, सुधाप्पा कुलकर्णी, संजीवनी कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, श्रावण आसने, रोहिदास होन, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे यावेळी उपस्थित होते.
आ. कोल्हे म्हणाल्या, “”गावच्या विकासाला प्राधान्य देत थेट ग्रामपंचायतीकडे निधी वर्ग केला जात आहे. येसगावसाठी सर्व सुखसुविधा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. हा धागा अधिक मजबूत होण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटते. आमदारकीच्या माध्यमातून तालुक्‍यातील थांबलेल्या विकासाला चालना देऊन रस्ते, वीज, पाणी यासह अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.”

माजी सरपंच बापूसाहेब सुराळकर म्हणाले, “”माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येसगाववासियांसह कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रहिवाशांची हागणदारीमुक्‍त गावासाठी मानसिकता बदलण्याचे काम केले. स्वतःच्या गावाकडे अधिक लक्ष देऊन येसगावला संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियानात देशपातळीवर पोहोचवले. तत्कालीन राष्ट्रपतींच्या वतीने विविध पारितोषिके गावाला मिळवून दिली.” सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी ए. पी. सय्यद यांनी केले. सरपंच शीतल पाईक यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)