जाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग२)

जाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग१)

वैयक्तिक माहितीची विक्री – तुम्ही मॉलमध्ये किंवा इतरत्र खरेदीसाठी जाता तेव्हा डिस्काऊंट मिळेल असे सांगून तिथे मार्केटिंग करणाऱ्यांनी तुमच्याकडून फोन नंबर, ई-मेल पॅन क्रमांक, आधार क्रमांक अशी वैयक्तिक माहिती घेतलेली असते. या माहितीची ते अन्यत्र विक्री करतात. अनेकदा हॅंकर्स अशांकडून तुमची माहिती प्राप्त करतात. मग तुमच्या अकाऊंट लॉक झाल्याचे किंवा तुमच्या कार्डची मुदत संपत आल्याचे आणि तुम्ही तातडीने आवश्‍यक ती कार्यवाही करण्याची गरज असल्याचे दूरध्वनीवरून बोलणारा सांगतो. ते अगदी शांतपणे तुमची कशी अडचण किंवा नुकसान होऊ शकते हे पटवून देतात आणि बोलण्याच्या ओघात तुमचे युजरनेम, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक, पिन क्रमांक अशा गोष्टी कधी तुमच्याकडून वदवून घेतात हे तुमच्या लक्षात येत नाही. मग ते तुमच्या खात्यावर काही रक्कम भरण्याचा प्रयत्न करतात.

-Ads-

त्यासाठीचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर आला की तो विचारून घेतात. असा ओटीपी किंवा अगदी बॅंकेचा खाते क्रमांकही अशा अनोळखी व्यक्तीला सांगू नये, अगदी बॅंकेतून फोन आला तरी देखील सांगू नये, असे तज्ञ वारंवार सांगत असतात. तुम्ही स्वतः बॅंकेच्या शाखेत फोन करून खात्याबाबत विचारणा केली तरच व्हेरिफिकेशनसाठी बॅंकेने विचारणा करावी असा नियम आहे. त्यामुळे सायबर लुटारूला तुमच्या खात्याचे तपशील मिळत नाहीत. अशा स्थितीत तो पुन्हा लगेचच तुम्हांला फोन करतो आणि तुमच्या खात्यात मोठीच अडचण निर्माण झाल्याचे सांगतो आणि फोन डिसकनेक्‍ट करतो. अशावेळी बहुतेक खातेदार घाबरून पुन्हा त्याच क्रमांकावर फोन करतात आणि त्याच्या जाळ्यात अडकतात. तो फोन उचलतो आणि तुम्हांला खात्याचे तपशील विचारतो. ते तुम्ही लगेच सांगून टाकता. त्यामुळे असा फोन डिसकनेक्‍ट झाला तर त्यावर पुन्हा उलटा फोन कधीही करायचा नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या बॅंकेच्या शाखेच्या क्रमांकावर फोन करा आणि तुमच्या मनातील शंका विचारा.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)