जाणून घ्या विवाह विम्यातील तरतुदी 

अंजली महाजन 

लग्नसोहळा म्हटलं की खर्चाला सीमा राहत नाही. पत्रिकेपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंचा खर्च करताना लग्नाचे बजेट लाखो रुपयाच्या घरात जाते. जेवणावळी, रोषणाई, वर-वधुंचे महागडे कपडे, वऱ्हाडी मंडळींचे सोपस्कार, आलिशान बॅंड, घोडागाडी, फुलांची आणि फटाक्‍यांची आतषबाजी या गोष्टींची रेलचेल असते. त्यामुळे खर्चाला मर्यादा राहत नाही. परंतु दुदैवाने काही अप्रिय घटनामुळे विवाह सोहळा स्थगित करावा लागला किंवा पुढे ढकलावा लागला तसेच लग्नसोहळ्यात एखादी घटना घडली तर वधुपित्यावर आर्थिक संकट ओढवते. आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक झालेल्या लग्नसोहळ्याला गालबोट लागले तर वऱ्हाडी मंडळीचे मनोधेर्य खचते. अशी स्थिती उदभवू नये परंतु आलीच तर त्याचा सामना करायचा असेल तर सोहळ्याचा विमा उतरवणे हा एक उत्तम आणि महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. बिगर जीवन विमा मंहामंडळांनी अशा प्रकारच्या वेडिंग इन्शुरन्सची सुरवात केली असून या विम्याच्या माध्यमातून कोणकोणते फायदे मिळवू शकता, हे पाहता येईल. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फायदे : विवाह सोहळा हा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवी कारणाने रद्द झाला आणि त्यात जीवित आणि वित्तहानी झाली तर विमा कंपनी संपूर्णपणे भरपाई देते. विमा कालावधीच्या काळात लग्नसोहळ्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी विमा कंपनी घेते. एखाद्या दुर्घटनेमुळे काही नुकसान झाल्यास किंवा कोणी जखमी झाल्यास त्याची भरपाई करून दिली जाते. मालमत्तेत लग्नासाठी उभारण्यात आलेला सेट, ज्वेलरी आणि अन्य गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या मालमत्तेची हानी मानवी किंवा नैसर्गिक कारणामुळे झाली असेल तर त्याची चाचपणी आणि तपासणीनंतर भरपाई दिली जाते.

विम्यातून वगळलेल्या बाबी: 
विवाह सोहळा जर बंद, आंदोलन किंवा हिंसाचारामुळे रद्द झाला तर त्याची भरपाई विमा कंपनीकडून दिली जात नाही.
दहशतवादी हल्ला झाल्यास भरपाई दिली जात नाही.
विमाधारक व्यक्तीचे अपहरण झाले तर भरपाई दिली जात नाही.
जर वाहतूक व्यवस्थेच्या अभावी संबंधित व्यक्ती लग्नाच्या ठिकाणी पोचला नाही तर भरपाई दिली जात नाही.
अकस्मिक कारणामुळे नुकसान झाले असेल तर भरपाईचा विचार होत नाही.
आत्महत्या किंवा स्वत:ला जखमी करून घेतल्यास भरपाई दिली जात नाही.
युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा युद्धामुळे विमाधारकाचा मृत्यू किंवा जखमी झाल्यास भरपाईचा विचार केला जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)