जाणून घ्या रक्तदानाविषयी महत्वाची माहिती…

रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे : – 
वयाच्या 18 वर्षानंतर (65 वर्षापर्यंत)
वजन 45 कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..
रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रॅम असल्यास..
आपण पूर्णपणे निरोगी असल्यास..
दर 3 महिन्यांनी आपण रक्तदान करावे.
जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात आपण रक्तदान करू शकता.

रक्तदान कोण करू शकत नाहीत ? 
मागील 3 दिवसांत कोणतेही पतिजैविक औषध घेतले असल्यास.
मागील 3 महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
मागील 1 वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होवून रेबीजची लस घेतली असल्यास.
6 महिन्यापूर्वी आपली मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.
गर्भवती महिला, महिलेला 1 वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा 6 महिन्यात गर्भपात झाला असल्यास.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कायमचे बाद रक्तदाते :- 
कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, काविळ (ब, क प्रकारची), एड्‌स, मुत्रिपड रोग, यकृताच्या व्याधी असल्यास.

रक्तदानाचे फायदे : 
रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, काविळ (ब, क पकारची), मलेरिया)
वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
रक्तगट व हिमोग्लोबीनच्या पमाणाबाबत माहिती मिळते.
बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग पतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.
नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे पमाण आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय, यकृता सारखे अवयव स्वस्थ राहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)