जाणून घ्या ‘बॅंका सहा दिवस बंद राहणार’ या अफवेबाबतचे सत्य

नवी दिल्ली: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बॅंका सहा दिवस बंद राहणार असल्याच्या अफवा विविध समाजमाध्यमातून फिरत असल्यामुळे जनसामान्यांमध्ये अकारण गडबड निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अर्थ मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बॅंका खुल्या राहणार असून बॅंकिंग व्यवहार नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन सप्टेंबरला रविवार तर 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्याने बॅंकांना सुट्टी राहणार आहे तर 3 सप्टेंबरला ज्या राज्यात सुट्टी जाहीर झाली आहे अशा काही राज्यातच बॅंकांना सुट्टी राहील असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

या दिवशीही सर्व राज्यातली एटीएम पूर्णत: कार्यरत राहतील आणि ऑनलाईन बॅंकिंग व्यवहार करता येतील. एटीएममध्ये पुरेशी रोकड ठेवावी अशा सूचना बॅंकांना करण्यात आल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुट्टया वगळता इतर दिवशी बॅंकांचे कामकाज सुरू राहील. यामुळे बॅंकांच्या ग्राहकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही असे सरकारने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)