जाणून घ्या ‘पद्मावत’ची रेकॉर्डब्रेक कमाई

संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त चित्रपट ‘पद्मावत’ने पहिल्या आठवड्यातील शनिवार-रविवारमध्ये 115 कोटी रुपये कमविले आहेत. रविवारी 31 कोटी रुपयांची या चित्रपटाने कमाई केली. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते सोमवारीसुद्धा या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी केली असून 15 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात यासारख्या तीन प्रमुख राज्यांमध्ये ‘पद्मावत’ रिलीज चित्रपट रिलीज करण्यात आलेला नाही. पद्मावतने पेड प्रीव्यूवद्वारे, गुरुवारी 19 कोटी, शुक्रवारी 32 कोटी, शनिवारी 27 कोटी आणि रविवारी 31 कोटी रुपये कमविले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)