जाणून घ्या ‘दह्याचे’ उपयोग…

दुधात विरजण घातल्याने दही बनते. दही दुधापेक्षाही गुणकारी असते. फारसे आंबट नसलेले, चांगले लागलेले, मधुर दही उत्तम समजले जाते. अर्धवट लागलेले दही त्रिदोषकारक व दाह निर्माण करणारे असते. दूध गरम करून विरजलेल्या दुधाचे दही स्वादिष्ट, स्निग्ध, गुणकारी व पित्तनाशक असते. साय काढून घेतलेल्या दुधाचे दही जुलाबावर गुणकारी, थंड, रुचकर व पचण्यास हलके असते. साखरेबरोबर दही सेवन केल्याने त्यातील पाचकशक्‍ती वाढते.

फडक्‍यातून गाळलेल्या दह्याला चक्का म्हणतात. चक्‍क्‍यापासून बनवलेले श्रीखंड दाहनाशक, पित्तनाशक व मधुर असते. दही नुसते न खाता ते मुगाच्या किंवा तुरीच्या वरणाबरोबर खावे. शरद, ग्रीष्म व वसंत ऋतूंमध्ये दही खाणे हितकर नसते. तसेच रात्री दही खाऊ नये. खायचे असल्यास त्यात तूप, साखर, मुगाची डाळ, मध किंवा आवळ्याचे चूर्ण घालून घ्यावे. तीव्र सर्दी असणाऱ्या लोकांनी दही खाणे हितकर नसते. दह्याच्या पाण्याला “दह्याची निवळी’ म्हणतात. दह्याची निवळी बलवर्धक, हलकी, भूक वाढवणारी असते.

गृहोपयोगी कानमंत्र
दही लावताना त्यात एक चमचा मिल्क पावडर घालून दूध घुसळून ठेवावे. दही घट्ट, कवडीसारखे होते.
थंडीमध्ये एका बाऊलमध्ये गरम पाणी घालून त्यात विरजणाचे भांडे ठेवावे, दही लवकर लागते.
फळे दुधात घालून खाण्याऐवजी गोड दह्यात घालून खावीत.
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही-भात खाल्ल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो.
केसांत कोंडा झाल्यास केसांना दही लावून ठेवावे व नंतर केस धुवावेत. कोंडा कमी होतो.
दूध, दही, तूप, मध व साखर या पंचामृताचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्‍ती वाढते व शरीर धष्टपुष्ट होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)