जाणून घ्या त्रिबंधात्मक प्राणायामाचे फायदे

वात, पित्त, कफ या त्रिदोषांचे शमन होते.


पचनक्रिया उत्तम होते पोटाचे सर्व विकार दूर होतात.


हृदय, फुफ्फुसे व डोक्‍यासंबंधीचे सर्व आजार बरे होतात.


जाडीचा किंवा अतिरिक्‍त चरबीचा रोग, मधुमेह, ऍसिडिटी, कब्ज, गॅस, आम्लपित्त, श्‍वसनाचे रोग, ऍलर्जी, रक्‍ती आव किडनीचे रोग, गुप्तरोग, योनिचे रोग तसेच कॅन्सरपर्यंतचे गंभीर आजार प्राणायाम जर शास्त्रोक्‍त पद्धतीने केला तर बरे होतात.


रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.


वंशपरंपरांगत चालणारा मधुमेह, हृदयरोग यापासून सुटका होते.


म्हातारपण उशिरा आपल्या आयुष्यात प्रवेश करते व आपण दीर्घायू होतो.


केसांच्या सर्व समस्या, चेहऱ्यावरील सुरकुत्या, नेत्र रोग ,दृष्टीदोष ,स्मृतिभ्रंश यासारख्या रोगांपासून त्रिबंधात्मक प्राणायामच आपल्याला वाचवू शकतो.


चेहऱ्यावर आभा, ओज तेजस्विता व शांतीची प्रभा येते.


मन स्थिर, शांत, प्रसन्न व उत्साहवर्धक राहू शकते त्यामुळे डिप्रेशन किंवा औदासिन्यता कायमचे दूर होते.


आपोआप ध्यानधारणाही होऊ लागते. ध्यानाचा सखोल अभ्यास करण्याची सवय व सामर्थ्य प्राप्त होते.


स्थूल तसेच सुक्ष्म देहाचे सर्व रोग व काम क्रोध, लोभ , मद, मोह, अहंकार या षट्रिपूंवर विजय मिळविण्यात मदत होते. आपले मानसिक रोग नष्ट होतात.


शरीरांतर्गत सर्व विकार, नकारात्मक दृष्टीकोन, विषारीपदार्थ नष्ट होतात.


सकारात्मक विचार, चिंतन व उत्साहवर्धक शरीर व मन हे केवळ त्रिबंधात्मक प्राणायामामुळे राहू शकते.


अशा प्रकारे प्राणायाम करताना प्राणायामाच्या विविध प्रक्रिया समजून घेऊन त्या अभ्यासणे आवश्‍यक आहे. प्रत्येक प्रकारचा प्राणायाम हा शरीराला फायदेशीर ठरणारा आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या शरीराला प्राणायामाचा फायदाच होतो. योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्‍त पद्धतीने प्राणायामाचे विविध प्रकार शिकून घेऊन त्याचा अवलंब करावा. पण त्रिबंधात्मक प्राणायाम करण्याची नियमित सवय लावावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)