जाणून घ्या ‘डाऊन सिंड्रोम’ची लक्षणे

डाऊन सिंड्रोमला वैद्यकीय परिभाषेत “ट्रायसोमी 21′ असे म्हणतात. हा आजार जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये असतो. मराठी बोलीभाषेमध्ये असा आजार असणाऱ्या मुलांना “मंगोलियन’ असे संबोधले जाते; पण असे बोलणे संपूर्णपणे चुकीचे आहे. येत्या 21 मार्च रोजी येत असलेल्या डाऊन सिंड्रोम डे निमित्त…

नवजात अर्भकांध्ये वेगवेगळ्या लक्षणांवरून हा आजार निर्माण झाल्याचे दिसून येते. जसे, काही मुले जन्मतःच शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेली असतात. काही मुले जन्मल्यानंतर वारंवार निळसर पडू लागतात. त्यांना मातेचे स्तनपान करण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच ह्रदयाचे ठोकेही अनियमित असू शकतात. काही नवजात बालकांमध्ये थायरॉइडचे प्रमाण रक्‍तनमुना चाचण्यांमध्ये आढळून येते. तर काही बालकांमध्ये आंतड्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे आढळून येते. त्यामुळे स्तनपानाची समस्या किंवा शौचाला होण्याची समस्या भेडसावते. आतडे व अन्ननलिका यांच्यातील जन्मजात सदोषतेमुळे हे घडते.

-Ads-

अन्य काही लक्षणे
डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्‍ती कमी असते. तसेच बालवयातच आंतड्याच्या पचनशक्‍तीवर परिणाम झाल्याचे आढळून येते. तसेच त्यांना अपस्पाराचे सौम्य ते तीव्र धक्‍केसुद्धा येऊ शकतात. त्यांना दृष्टीदोषही उत्पन्न होऊ शकतो. तसेच हाडांच्या समस्या पाठीच्या मणक्‍याच्या समस्याही उद्‌भवू शकतात; परंतु इथे असे नमूद करणे आवश्‍यक ठरते की डाउन सिंड्रोमने आजारी असणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीमध्ये वरीलपैकी सगळ्याच आरोग्यविषयक समस्या उद्‌भवतीलच असे नाही. या आरोग्यविषयक समस्यांचे स्वरूप व्यक्‍तीनिहाय बदलते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)