जाणून घ्या ‘कोई मिल गया’मधील ‘जादू’विषयी या खास गोष्टी

2003 मध्ये प्रदर्शित झालेला हृतिकचा ‘कोई मिल गया’  हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामधील एक पात्र ‘जादू’ हे सिनेरसिकांच्या चांगलेच लक्षात राहील. या चित्रपटात एलियन ‘जादूची’  भूमिका इंद्रवदन जे पुरोहितने साकारली होती. इंद्रवदनची उंची फक्त 3 फूट असल्यामुळे त्याला या भूमिकेसाठी निवडण्यात आले होते. इंद्रवदनने चित्रपटासोबतच अनेक मालिकात देखील काम केले आहे.

या चित्रपटासाठी जादूचा कॉस्ट्यूम ऑस्ट्रेलियामध्ये बनवण्यात आला होता. जेम्स कॉलनर नावाच्या आर्टिस्टने हे डिझाइन केले होते.  हा कॉस्ट्यूम बनवण्यासाठी एक वर्ष लागलं होतं. चित्रपटाचे डायरेक्टर राकेश रोशन यांनी एका कार्यक्रमात बोलताना या चित्रपटाविषयी  एक किस्सा सांगितला होता यामध्ये त्यांनी सांगितले की, चित्रपटाचा एक सीन आहे. यामध्ये जादू हत्तीला पाहून घाबरुन जातो. परंतू हे खरोखर झाले नव्हते. हत्तीच जादूला पाहून घाबरले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)