सिनेमा जेवढा मोठा तेवढीच त्याच्यासाठी वाटही बघायला लागते. याचा अनुभव रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या “2.0′ साठी येतो आहे. हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार असे समजले होते. यापूर्वीही “2.0’चा रिलीज काही वेळा पुढे ढकलला गेला आहे. आता पुन्हा त्याची रिलीजची तारिख बदलली गेली आहे. “2.0′ सर्वात पहिल्यांदा 28 एप्रिलला रिलीज होणार होता. पण स्पेशल इफेक्‍टची जबाबदारी ज्या अमेरिकन कंपनीवर सोपवली होती, तिने कामात बरीच गडबड करून ठेवली. त्यामुळे सिनेमा “3 डी’ करण्याचा प्लॅन रद्द करावा लागला. हे स्पेशल इफेक्‍टचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

मात्र बिघडलेले काम दुरुस्त करण्यात आले आहे. या गडबडीमुळे याची रिलीजची तारीख 15 ऑगस्ट निश्‍चित झाली. याच दरम्यान सिनेमा दिवाळीच्या दरम्यान रिलीज होणार असेही ऐकायला मिळाले होते. मात्र पोस्ट प्रॉडक्‍शन आणि मिक्‍सिंगचे राहिलेले काम यावर्षी जूनमध्ये पुन्हा सुरू होणार आहे. हे मिक्‍सिंग आणि “3 डी’चे काम अपेक्षेप्रमाणे जुलैमध्ये पूर्ण झाले तरच यावर्षी ऑगस्टमध्ये “2.0′ रिलीज होऊ शकेल. मात्र जानेवारी 2019 पूर्वी सिनेमा रिलीज होऊ शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.याच दरम्यान अक्षय कुमारचा “गोल्ड’देखील रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)