जाणून घ्या, उन्हाळ्यात का प्यावा उसाचा रस ?

उन्हाळ्यात रस्त्यावरुन जाताना घुंगरांचा आवाज ऐकू येताच आजही प्रत्येकाचे पाय त्याच्याकडे आपोआप वळतात. शहर असो वा खेडे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वंजणच आवडीने हा रस पिणे पसंत करतात. हा केवळ चवीसाठी चांगला आहे, असे नाही तर त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. ते पुढीलप्रमाणे…

ऊर्जा मिळते – उन्हाळ्याच्या दिवसात रखरखीत उन्हामुळे लवकर थकवा येतो. तुम्ही जर उसाचा रस घेतला तर यातील ग्लुकोज आणि इलेक्‍ट्रोलाईट्‌समुळे तुम्हाला ऊर्जा मिळून थकवा नाहीसा होतो.

त्वचा सुधारते – उसाच्या रसात अल्फा हायडॉक्‍सी ऍसिड आणि ग्ल्यायकोलिक ऍसिडचा मुबलक साठा असतो. यामुळे याचे सेवन केल्यास पिंपल्सचा त्रास, चेहऱ्यावरील डाग आणि एजिंगची समस्या कमी होते.

मधुमेहींसाठीही लाभदायक – यात ग्लुकोज असले तरीही त्यातील ग्ल्यासमिक इंडेक्‍स कमी असल्याने ते त्रासदायक होत नाही. यामुळेच मधुमेहीसुद्धा या रसाचे सेवन आरामात करु शकतात.

पचनाची समस्या – उसातील पोटॅशियमचे घटक पडन सुधारण्यास मदत करतात. पोटॅशियममुळे पोटातील संसर्गाची समस्याही कमी होण्यास मदत होते.

ड्रिहायड्रेशनपासून मुक्ती – उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे डिहायड्रेशनची समस्या कमी होण्यास मदत होते. यात कॅल्शिअम, पोटॅशिअम, आर्यन, मॅगनीज यांचा साठा मुबलक प्रमाणात असतो. यामुळे शरीराला इल्क्‍ट्रोलाईट्‌स आणि पाणी यांचा मुबलक पुरवठा होतो.

यकृताच्या समस्या – उसाच्या रसाच्या सेवनाने शरीरातील बिलीरुबिन पातळी सुधारण्यास मदत होते. यामुळेच काविळ झाल्यावर उसाचा रस पिण्यास दिला जातो. तसेच यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते असल्याचेही अभ्यासात आढळून आले आहे.

किडनीचे कार्य सुधारते – उसातील प्रोटीन घटक किड़नीचे कार्य सुधारतात. उस अल्काईन असण्यासोबतच अँटीबायोटीकदेखील आहे. यामुळे मूत्रविसर्जनावेळी होणारी जळजळ दूर करण्यात हा रस फायदेशीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)