जाणून घ्या ‘उडीद’ डाळीचे उपयोग…

वातरोगावर – उडीद हे कडधान्य शक्‍तिवर्धक आहे. वातरोगावर ह्याचे वडे करून खावेत.त्यासाठी रात्री एक मूठभर उडदाची डाळ म्हणजे 40 ग्रॅम पाण्यात बुडेपर्यंत भिजत घालून ठेवावी. सकाळी त्यात चवीपुरते मीठ, चिमूटभर हिंग व एक लहान आल्याचा तुकडा घालून ती डाळ वाटावी आणि छोटे-छोटे वडे थापून गाईच्या साजूक तुपात ते तळावेत. वात झालेल्या माणसांनी ते वडे लोण्याशी जर रोज सकाळी खाल्ले तर त्याने वातरोग बरा होण्यास मदत होते.

अर्दित वातात म्हणजेच ज्यावेळी वात विकाराने तोंड वाकडे झाले असेल तर हे वडे खाल्ल्याने अर्दित वात बरा होण्यास मदत होते. अशक्‍तपणात शक्तिवर्धक तसेच धातुपुष्टतेसाठी – नुकताच जर ताप येऊन गेल्यामुळे आलेल्या अशक्तपणासाठी उडीद मोठे टॉनिक आहे. यासाठी उडदाची डाळ चांगली भाजून दळावी व जितके पीठ तितकेच गाईचे साजूक तूप घेऊन ते पीठ चांगले खमंग भाजावे व त्याच्या दुप्पट साखर घालून अंदाजे 40 ग्रॅम लाडू बांधावे. हा लाडू अर्धा किंवा एक असे दिवसातून एकवेळ सकाळी खावे, यामुळे चांगली शक्ति येते. धातुपुष्टतेसाठी हे लाडू थंडीच्या दिवसात खावेत. याने धातु पुष्ट होऊन चांगली शक्‍ती व तरतरी येते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)