जाणून घ्या ‘अशोका’ वृक्षाचे उपयोग…

अशोकाचे झाड आंब्याप्रमाणे दिसते. हे रामायणात फार प्रसिद्ध आहे. ह्याच वृक्षाखाली श्री सीतादेवीस रावणाने ठेवले होते, असे म्हणतात.

प्रदर
ह्या झाडाचा विशेष उपयोग म्हणजे प्रदरशांतीवर होतो. स्त्रियांना अंगावर जे पाणी जाते त्यास प्रदर म्हणतात. हे पाणी लाल रंगाचे असेल तर त्यास रक्तप्रदर म्हणतात. रक्तप्रदरावर गुणकारी वनस्पती म्हणजे अशोक. अशोकाची अंर्तसाल म्हणजे गाभा आणून तो गंधाप्रमाणे उगाळावा. हे अशोकाच्या सालीचे दहा ग्रॅम गंध, 50 ग्रॅम तांदळाचे धुवण म्हणजे तांदूळ धुतलेले पाणी, दहा ग्रॅम खडीसाखर व अडीच ग्रॅम मध घालून हे औषध दिवसातून तीन वेळा घ्यावे. कसल्याही प्रकारचा कितीही जुनाट रक्तप्रदर असू दे तो चार दिवसांत हटकून बरा झालाच पाहिजे.

गर्भाशयाला सूज आली असता
125 ग्रॅम दूध तेवढेच पाणी घेऊन त्यात 20 ग्रॅम अशोकाचे सालीचे चूर्ण घालावे हे मिश्रण उकळावे. पाणी आटून गेल्यावर उतरवावे. गाळून त्यात चवीपुरती साखर घालून बनवलेले अशोकारिष्ट दिवसातून तीन वेळा घ्यावे. रक्तप्रदर तसेच गर्भाशयाची सूज ओसरते.

मासिक पाळी लांबत असेल तर
अशोकारिष्ट हे अशोकाचे बनवतात.125 ग्रॅम दूध तेवढेच पाणी घेऊन त्यात 20 ग्रॅम अशोकाचे सालीचे चूर्ण घालावे हे मिश्रण उकळावे. पाणी आटून गेल्यावर उतरवावे. गाळून त्यात चवीपुरती साखर घालून बनवलेले अशोकारिष्ट दिवसातून दोन वेळा घ्यावे. अशाप्रकारे शोभेचे वाटणारे अशोकाचे झाड आयुर्वेदियदृष्ट्‌या अतिशय गुणकारी आहे.

सुजाता गानू 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)