जाणून घ्या अरुण जेटली का ठरतायेत भाजपासाठी संकट मोचक… 

File photo..
स्विसबँकांमधील भारतीयांच्या ‘डिपॉझिट्स’ मध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी केंद्रातील भाजपा सरकारला घेरण्यासाठी कंबर कसली आहे. राहुल गांधी (वाचा राहुल गांधी काय म्हणतायेत स्विसबॅंकांतील पैशांबाबत), सीताराम येचुरी अशा बड्या नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दरम्यान भाजपाचे जेष्ठ नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाजपासाठी ‘संकटमोचक’ ठरत विरोधकांवर बरसले आहेत.
अरुण जेटली यांनी काँग्रेसला खडे बोल ऐकवताना या विषयावर बोलण्याआधी काँग्रेसने ‘मूलभूत तथ्यांचा’ अभ्यास करायला हवा. काही दशकांपूर्वी स्वित्झर्लंड मधील बँका कर चुकव्यांना मदत करीत होत्या हे तथ्य असलं तरी आजची परिस्थिती बदलली आहे. स्विसबँकांमधील कारभार हा आता पारदर्शक झाला असल्याचे त्यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून सांगितले.
 संबंधित वृत्त 

स्विसबॅंकांतील भारतीयांचा वाढता काळा पैसा आश्चर्याची बाब नाही : सीताराम येचुरी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)