जाणून घेऊया ‘कायफळ’ विषयी

सर्दी डोकेदुखीवर – कायफळ सर्दीवर फार मोठे औषध आहे. डोके दुखणे, डोके जड होणे, अंग दुखणे ह्यास शरारत किंवा पडसे किंवा सळेगम म्हणतात. ह्यात कायफळ साल 20 ग्रॅम व 10 ग्रॅम दालचिनी म्हणजे दालचिनीची 1 मोठी काडी घालून अर्धा लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा करून त्यात 30 ग्रॅम खडीसाखर घालून रोज सकाळ-संध्याकाळ एक छोटा चमचा घ्यावा. सर्दी बरी होते. सर्दीमूळे जर अंगात कणकण किंवा ताप आला असेल तर तो बरा होतो.डोकेदुखीवर नाकात कायफळ चूर्ण ओढल्याने शिंका येऊन डोके हलके होते व सर्दी बरी होते.

खोकल्यावर – खोकल्यावर 20 ग्रॅम कायफळाची साल, अडुळशाची पाच पाने ठेचून अर्धा लिटर पाण्यात घालून चांगली उकळवावी. एक अष्टमांश काढा उरवावा. हा कायफळाचा काढा रोज सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा खोकला बरा होईपर्यंत घ्यावा.
दम्यावर– दम्यावरदेखील कायफळ औषधी आहे. तू पालटला असता दम लागण्याचा त्रास काहीजणांमध्ये असतो. अशावेळी 20 ग्रॅम कायफळाची साल, अडुळशाची पाच पाने ठेचून अर्धा लिटर पाण्यात घालून चांगली उकळवावी.एक अष्टमांश काढा उरवावा. हा कायफळाचा काढा रोज सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा दमा कमी होईपर्यंत घ्यावा. त्यास उत्तम.
भूक लागण्यासाठी – भूक लागण्यासाठी 20 ग्रॅम कायफळाची साल, अडुळशाची पाच पाने ठेचून अर्धा लिटर पाण्यात घालून चांगली उकळवावी.एक अष्टमांश काढा उरवावा.हा कायफळाचा काढा रोज सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा घ्यावा.
अजीर्णावर व अतिसारावर – अजीर्णावर तसेच अन्न न पचता होणाऱ्या अतिसारावर कायफळ काढा घ्यावा.
कॉलरा व जुलाबात- कॉलरात लघवी अडली असेल तर कायफळ काढ्याने लघवी सुटते व जुलाब थांबतात.
खरूज, कांटा, कोडावर – 35 ग्रॅम कायफळाची साल कुटून 900 मिलि पाण्यात एक अष्टमांश काढा उरवावा. काढा गाळून कढईत चांगला कढ काढावा. त्यात 35 ग्रॅम तीळ तेल घालावे व तो आटेपर्यंत शिजवावा. नुसते तेल राहिल्यावर गाळून घ्यावे. असे कायफळ तेल वैद्याच्या मार्गदर्शनाखाली तयार करावे.जे बहुगूणी आहे. ते लावल्यास खरूज, कांटा, कोड बरे होतात.

-Ads-

गर्भाशयशुद्धीसाठी – कायफळ स्त्रियांचे गर्भाशय शुद्ध करते.ह्यासाठी कायफळाचे चूर्ण घ्यावे. 20 ग्रॅम कायफळ सालीचा अर्धा लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवावा. तो गाळून त्यांत दोन चमचे फळाचे चूर्ण घालून सकाळ संध्याकाळ एक छोटा चमचा घ्यावा. यामुळे गर्भाशय शुद्धी होते व बायकांना आर्तव साफ येते.
मासिकपाळी वेळेवर येण्यासाठी – कायफळाचे चूर्ण किंवा काढा पोटातघेताच मासिक पाळी वेळेवर येते.तसेच मासिक पाळीत आर्तव खूप पडून गर्भाशयाचे रोग नाहीसे होतात.
उत्तम भूकेसाठी – भूकेसाठी कायफळ चूर्ण रोज घ्यावे. छान भूक लागते.
लहानांसाठी कायफळाची संजीवन गूटी – लहान मुलांची तीन औषधांची गुटी आहे. कायफळ, मायफळ, जायफळ ह्या तिन्हींची गुटी घेतल्यास काहीही रोग होत नाही. थंडीत ऊब येण्यास कायफळाचे चूर्ण लहान मुलांच्या अंगास चोळतात. लहान मुलांचे सर्दीचे सर्व विकार बरे होतात. त्यांच्या डोकेदुखीवर नाकात कायफळ चूर्ण किंचित्‌ घालतात.शिंका येऊन डोके हलके होते.

दंत दुखी,कान दुखी,अंग दूखीवर – 35 ग्रॅम कायफळाची साल कुटून 900मि. लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवावा. काढगाळून कढईत चांगला कढ काढावा. त्यात 35 ग्रॅम तीळ तेल घालावे व तो आटेपर्यंत शिजवावा. नुसते तेल राहिल्यावर गाळून घ्यावे.असे कायफळ तेल वैद्याच्या मार्गदर्शनाखाली तयार करावे.जे बहुगूणी आहे. कानात घातल्याने कानातून पू वहाणे थांबते. अंगास मर्दन केल्याने अंगदुखी थांबते. दातांना लावल्याने दातदुखी बरी होते. तेल करताना फळाची साल वापरतात.अशाप्रकारे कायफळाचे अनेक औषधी उपयोग आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)