जाणून घेऊयात ‘वनप्लस 6’ बद्दल…

स्पर्श

वनप्लस 6 हा स्मार्टफोन काहीच दिवसांपूर्वी भारतात लॉंच करण्यात आला. वनप्लस 6 हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 34,999/- रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 39,999रुपये आहे. वनप्लस 6 मध्ये 6.28 इंच फुल एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. याचं 1080.2260 पिक्‍सल रेझ्युलेशन आहे. तसंच यात गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्‍शन देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात आयफोन द प्रमाणे नॉच, स्लो-मो, स्नॅपड्रॅगन 845 या सारखे बरेच फीचर देण्यात आले आहेत तसेच फेस अनलॉकसारखे फीचरही देण्यात आले आहेत.

यामध्ये ड्यूल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 16 मेगापिक्‍सल तर सेकंडरी लेन्स 20 मेगापिक्‍सल आहे. तर यामध्ये फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्‍सल देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 3300mAh क्षमतेची आहे.

वनप्लस 6 ऍमेझॉन इंडियावर लॉंचच्या दिवशी सर्वाधिक महसूल कमवणारा स्मार्टफोन बनला आहे. याफोनवर आकर्षक ऑफरहि आहेत.. सिटीबॅंक क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून फोन खरेदी करण्याकरिता 2,000 रुपये कॅशबॅक, आणि मोठ्या बॅंकांकडून 3 महिन्यांपर्यंत कमी दराने ईएमआय. यांनतर 29 मे ला भारतात वनप्लस 6 मार्वल ऍव्हेंजर्स लिमिटेड एडिशन लॉंच करण्यात आला ज्याची किंमत रुपये 44,999 इतकी आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात महाग फोन आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)